About Us
आमच्याविषयी –
पुरंदर तालुक्यात मौजे नीरा शिवतक्रार येथे एका नवीन ई न्यूज पोर्टलची सुरुवात करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. हे पोर्टल सर्वसामान्य लोकांचा, पिडीत, सोशितांचा आवाज बनावे त्याने पिडीत, सोशीत, वंचित लोकांचा आवाज बनून प्रशासन, न्यायपालिका, लोकप्रतिनिधीपर्यंत पोहचवावा. तसेच हा आवाज त्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ज्यांनी आजवर कार्य केले व करत आहेत अशा पत्रकार बंधू – भगिनींचा देखील वेळप्रसंगी त्याने आवाज होण्याचे शिवधनुष्य पेलावे असे मनोमन वाटते. अपेक्षा प्रचंड आहेत हे लक्षात येत असले तरी त्या अत्यावश्यक देखील वाटतात.
बुद्धिप्रामाण्य, आत्मोपौम्यता वाढीस लागावी तसेच सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा मिळावी या सदहेतूने आम्ही या वाहिनीची सुरुवात करीत आहोत. या वाहिनीचे वेगळेपण आपल्या हळूहळू लक्षात येईलच. तरीही या पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या ई वृत्ताबाबत काही अडचण असल्यास कार्यकारी संपादक यांना संपर्क करावा. त्यायोगे आपले निराकरण न झाल्यास सदर पोर्टल हे सासवड न्यायालयीन कक्षेत येत असल्याने आपण तेथे संपर्क साधू शकता. धन्यवाद.

श्रद्धाताई जोशी
मुख्य संपादिका, लोकसंधान
मो. ९९६०४९७५२२

राहुल शिंदे
कार्यकारी संपादक, लोकसंधान
मो. ९८६०६४६६७४

ॲड. बापूसाहेब शिलवंत
कायदा विभाग

ॲड. अमोल यादव
कायदा विभाग
‘लोकसंधान’ या ई न्यूज पोर्टलवरील बातम्या, लेखांशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही. बातम्यांची प्रसिद्धी कार्यकारी संपादक यांच्या देखरेखीखाली होत असल्याने वृत्ताशी असहमत असल्यास कार्यकारी संपादक यांच्या ९८६०६४६६७४ या क्रमांकावर संपर्क साधावा. निराकरण न झाल्यास या पोर्टलशी संबंधित न्यायालयीन वाद सासवड येथील न्यायालयाच्या अधिकारकक्षेत राहतील याची नोंद घ्यावी.
