💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
Todayताज्या घडामोडीमहत्त्वाचे अपडेट्सशिक्षण

लोणंद येथील परीक्षा केंद्रावर ५०३ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा


श्रद्धा जोशी.
निरा, ता. २२ :

लोणंद (ता.खंडाळा) येथील मालोजीराजे विद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (गर्ल) येथे आज रविवार (ता.२२) रोजी पाचवी व आठवी इयत्तांची शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत पार पडली. परीक्षेसाठी एकूण ५०३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. केंद्राकडून दक्षता घेत शिस्तबद्ध नियोजन केल्याचे यानिमित्ताने दिसून आले. दहावी, बारावीच्या परीक्षांप्रमाणे शिस्तबद्ध पद्धतीने परीक्षा पार पडली.  

 इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्तीसाठी २६२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. पैकी मराठी माध्यमाच्या १८० तर  इंग्रजी माध्यमाच्या ८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पाचवीसाठी  हनमंत बोराटे यांनी केंद्र संचालक म्हणून काम पाहिले.

इयत्ता आठवीच्या एकूण २४१ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली. यामध्ये मराठी माध्यमाचे १७४ तसेच इंग्रजी माध्यमाचे ६७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते.  अशोक वाघोले यांनी केंद्र संचालक म्हणून काम पाहिले.

परीक्षा नियोजित वेळेत सुरु झाली व पार पडली. दरम्यान, माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक  महेश पालकर यांनी केंद्राला भेट देत नियोजन पाहिले. त्यांनी शिक्षकांशी संवाद साधला. या शिष्यवृत्ती केंद्राला गटशिक्षणाधिकारी गजानन आडे, शिक्षणविस्तार अधिकारी हनुमंत धायगुडे, शिक्षणविस्तार अधिकारी (खंडाळा बीट)  उर्मिला पवार,  केंद्रप्रमुख रोहिदास कापसे यांनी भेट दिली.

परीक्षेला सामोरे जाताना काही विद्यार्थी निवांत होते तर काही विद्यार्थ्यांची धाकधूक वाढलेली दिसत होती. मुलांना परीक्षेला सोडण्यासाठी पालकांनी केंद्रावर गर्दी केली होती. अनेक पालक आपल्या पाल्याला सूचना देताना दिसत होते. दुपारच्या सुट्टीतदेखील अनेक शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांची उजळणी घेतली.

📤 शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
निरेतील घंटागाडी चालकांची मनमानी

मोठ्या आवाजात हिंदी गाणी; कचरा टाकण्यासाठी महिलांची पायपीट श्रद्धा जोशी.निरा, ता. १४: निरा (ता. पुरंदर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून कचरा

निरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडण्याचे आदेश !

जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान; पुन्हा तपासणी करण्याची होतेय मागणी श्रद्धा जोशी.निरा, ता. २४: जवळपास अवघे शतकभर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आपल्या

लोणंद येथील परीक्षा केंद्रावर ५०३ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

शिस्तबद्ध नियोजन;  पोलिसांच्या उपस्थितीत परीक्षा सुरळीत पार श्रद्धा जोशी.निरा, ता. २२ : लोणंद (ता.खंडाळा) येथील मालोजीराजे विद्यालय आणि न्यू इंग्लिश