💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
गावगाडाTodayमहत्त्वाचे अपडेट्स

निरेतील घंटागाडी चालकांची मनमानी

श्रद्धा जोशी.
निरा, ता. १४:

निरा (ता. पुरंदर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून कचरा गोळा करून घेऊन जाणाऱ्या कचरा, घंटागाडी चालकांची मनमानी पाहायला मिळत आहे. नागरिकांच्या घरापर्यंत गाडी न आणता दूरवर उभी करणे, कधी गाडी न थांबवता केवळ तिचा वेग कमी करणे, स्वच्छतेबाबत प्रबोधन करणाऱ्या संदेशांऐवजी भल्या मोठ्या आवाजात हिंदी, मराठी चित्रपटातील गाणी लावून निरेतून कचरा गोळा करण्याचे काम सुरु आहे.

येथील घुले कॉलनीत शेवटच्या घरांपर्यंत गाडी घेऊन न जाता मध्येच रस्त्यात उभी केल्याचे प्रकार देखील अनेकदा घडले आहेत. त्यामुळे कचरा टाकण्यासाठी कचरा घेऊन पळत पळत महिलांना जावे लागत आहे. कचरा गाडी येण्याची नेमकी वेळ देखील नसून कोणत्याही वेळी कचरा गाड्या येत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.         

याबाबत प्रशासकांनी वेळीच लक्ष घालून कचरा वाहतूक करणाऱ्या चालकांना सूचना द्याव्यात अशी मागणी केली जात आहे. स्वच्छ निरा, सुंदर निरा यासाठी धडपड करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालावे तसेच कचरा गाडीत ज्येष्ठ व्यक्ती, महिला यांना कचरा टाकणे सुलभ व्हावे यासाठी मदतनीस गाडीसोबत ठेवावेत. भल्या मोठ्या आवाजातील गाण्यांचे भोंगे बंद व्हावेत, कचरा वाहतूक करणारी गाडी अंतिम घरांपर्यंत पोहोचावी यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता अनेकांनी बोलून दाखवली.

📤 शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
निरेतील घंटागाडी चालकांची मनमानी

मोठ्या आवाजात हिंदी गाणी; कचरा टाकण्यासाठी महिलांची पायपीट श्रद्धा जोशी.निरा, ता. १४: निरा (ता. पुरंदर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून कचरा

निरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडण्याचे आदेश !

जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान; पुन्हा तपासणी करण्याची होतेय मागणी श्रद्धा जोशी.निरा, ता. २४: जवळपास अवघे शतकभर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आपल्या

लोणंद येथील परीक्षा केंद्रावर ५०३ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

शिस्तबद्ध नियोजन;  पोलिसांच्या उपस्थितीत परीक्षा सुरळीत पार श्रद्धा जोशी.निरा, ता. २२ : लोणंद (ता.खंडाळा) येथील मालोजीराजे विद्यालय आणि न्यू इंग्लिश