💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
Todayताज्या घडामोडीपत्रकार

…तर आमच्या कुटुंबाच्या इतिहासातील एक पान कायमचे मिटून जाईल !


श्रद्धा जोशी.
निरा, ता. २५ :

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर निरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजल्यावर निरा व पंचक्रोशीतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यासह या पुलाच्या आठवणींनादेखील उजाळा दिला जात आहे. सोशल मिडीयावर अनेक प्रतिक्रिया उमटत असून पूल न पाडता त्याचे संवर्धन करण्याची मागणी जोर धरत आहे. दै. प्रभातचे पत्रकार श्री. प्रशांत ढावरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या आठवणीना उजाळा दिला असून पूल पाडण्यात आला; “तर आमच्या कुटुंबाच्या इतिहासातील एक जिवंत पान कायमचे मिटून जाईल…” अशी भावनिक पोस्ट लिहिली आहे.

येथील पुलाचे बांधकाम ब्रिटीशकाळात पार पडले. त्यावेळी पाडेगाव, निरा, गुळुंचे पंचक्रोशीतील अनेक कारागीर या पुलाचे बांधकाम करत असल्याचे आता दिसत आहे. पाडेगाव (ता. फलटण) येथील शंकर ढावरे हे दगडाचे कोरीव काम करणारे निष्णात कारागीर होते. पुलाच्या दोन्ही बाजूंना उभे असलेले चार भव्य दगडी स्तंभ त्यांनी स्वतः घडवले आणि कमानीतील अनेक दगड त्यांच्या हाताने आकार घेतल्याचे प्रशांत यांनी नमूद केले आहे. त्यांनी केवळ दगड रचले नाहीत, तर आपला घाम, कौशल्य आणि आयुष्याचा मोठा भाग त्या बांधकामात ओतला. शंकर ढावरे यांच्यावर बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव होता, म्हणूनच त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना शिक्षण देऊन या कष्टाच्या व्यवसायापासून दूर ठेवले. त्यामुळेच प्रशांत यांचे वडील आणि मोठे चुलते शिक्षक झाले, तर धाकटे चुलते वकील झाले.

नीरा नदीवरील ब्रिटिशकालीन संपूर्ण दगडी बांधकाम असलेला ऐतिहासिक पूल पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून धोकादायक ठरवून पाडण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजताच अनेकांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. आज याबाबत निरा ग्रामपंचायत सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी अनेकांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. कोणत्याही परिस्थितीत पूल न पाडता त्याचे संवर्धन करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

📤 शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
निरेतील घंटागाडी चालकांची मनमानी

मोठ्या आवाजात हिंदी गाणी; कचरा टाकण्यासाठी महिलांची पायपीट श्रद्धा जोशी.निरा, ता. १४: निरा (ता. पुरंदर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून कचरा

निरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडण्याचे आदेश !

जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान; पुन्हा तपासणी करण्याची होतेय मागणी श्रद्धा जोशी.निरा, ता. २४: जवळपास अवघे शतकभर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आपल्या

लोणंद येथील परीक्षा केंद्रावर ५०३ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

शिस्तबद्ध नियोजन;  पोलिसांच्या उपस्थितीत परीक्षा सुरळीत पार श्रद्धा जोशी.निरा, ता. २२ : लोणंद (ता.खंडाळा) येथील मालोजीराजे विद्यालय आणि न्यू इंग्लिश