💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
Todayपत्रकार

एप्रिलमध्ये उदगीर येथे राष्ट्रीय अधिवेशन : एस. एम. देशमुख


लोकसंधान टीम रिपोर्टर :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदच्या वतीने आयोजित रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा व वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा कर्जत (रायगड) येथील रॉयल गार्डनमध्ये उत्साहात पार पडला. राज्यभरातील सातशेहून अधिक पत्रकार या सोहळ्यास उपस्थित होते. यावेळी पत्रकारांना एप्रिल महिन्यात उदगीर तालुक्यात होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात देशमुख म्हणाले की, पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी परिषद राज्यभर कार्यरत असून वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. दर दोन वर्षांनी होणारे राष्ट्रीय अधिवेशन यंदा उदगीर येथे होत असून ते अधिक प्रभावी करण्यासाठी सर्व पत्रकारांनी एकत्र यावे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. कर्जत प्रेस क्लबने केलेल्या नियोजनाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमाला मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, विश्वस्त शरद पाबळे, किरण नाईक, दिपक कैतके, जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई, मंदार फणसे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, उपाध्यक्ष विशाल परदेशी, डिजिटल मीडियाचे अध्यक्ष अनिल वाघमारे, सरचिटणीस राहुल शिंदे, सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, मुंबई रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, कार्याध्यक्ष संजय मोहिते, कर्जतचे उपनगराध्यक्ष संजय पाटील, माजी अध्यक्ष भारत रंजणकर, कोकण विभागाध्यक्ष अनिल भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पत्रकारितेतील निर्भयतेचा आग्रह

यावर्षीचा ‘पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ’ पुरस्कार परभणी जिल्हा पत्रकार संघाला प्रदान करण्यात आला.

यावेळी रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष अभय आपटे व मुरुड तालुका प्रेस क्लब यांचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश पवार, कार्याध्यक्ष विलास श्रीखंडे, सल्लागार विजय मांडे, अजय गायकवाड, राहुल देशमुख, अनिल जावळे, विद्यानंद ओव्हाळ, मल्हार पवार, अतुल माळी यांच्यासह अनेक पत्रकारांनी परिश्रम घेतले.

राज्यभरातील पत्रकारांच्या एकजुटीचा संदेश देणारा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आगामी राष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार संघटनांना नवे बळ आणि दिशा देणारा हा मेळावा ठरला.

📤 शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
निरेतील घंटागाडी चालकांची मनमानी

मोठ्या आवाजात हिंदी गाणी; कचरा टाकण्यासाठी महिलांची पायपीट श्रद्धा जोशी.निरा, ता. १४: निरा (ता. पुरंदर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून कचरा

निरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडण्याचे आदेश !

जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान; पुन्हा तपासणी करण्याची होतेय मागणी श्रद्धा जोशी.निरा, ता. २४: जवळपास अवघे शतकभर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आपल्या

लोणंद येथील परीक्षा केंद्रावर ५०३ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

शिस्तबद्ध नियोजन;  पोलिसांच्या उपस्थितीत परीक्षा सुरळीत पार श्रद्धा जोशी.निरा, ता. २२ : लोणंद (ता.खंडाळा) येथील मालोजीराजे विद्यालय आणि न्यू इंग्लिश