💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
Todayताज्या घडामोडीप्रबोधन विचारमहत्त्वाचे अपडेट्सशिक्षण

पिंगोरी येथे भारतीय उलूक महोत्सवाची सुरूवात

१३० हून अधिक शाळांनी नोंदवला सहभाग

राहुल शिंदे
नीरा ता. ०४ :

पिंगोरी ( ता.पुरंदर) येथे सहाव्या उलूक महोत्सवाची सुरुवात झाली आहे. गुरुवार (ता.०४) पासून या उत्सवाला प्रारंभ झाला आहे. सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर आणि मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला . दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवास अंदाजे २५ हजार विद्यार्थी भेट देण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. त्याद्वारे नवीन पिढीत घुबडाबद्दलची माहिती पोहचून गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न होत आहे.


पुरंदर तालुक्यातील पिंगारी येथे ‘इला फाउंडेशनच्या’ माध्यमातून या महोत्सवाचे आयोजन केले जाते. हा सहावा उलूक उत्सव आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यातील अनेक शालेय विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. या उत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी घुबडाची काढलेली चित्रे, बनवलेल्या प्रतिकृती यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. घुबडाची रांगोळी आणि घोड्यांचे टॅटू यांनी लक्ष वेधले.


यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, सामाजिक वनीकरण विभागाचे माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. ए. के. झा, टाटा मोटर्सचे मुख्य व्यवस्थापक डॉ. नवीन पांडे, इला फाउंडेशनचे संचालक सतीश पांडे, सरपंच संदीप यादव, माजी सरपंच जीवन शिंदे, उपसरपंच प्रकाश शिंदे, पोलीस पाटील राहुल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते गोविंद शिंदे, डॉ संजय रावळ, नंदकुमार सागर, रामदास शिंदे, वसंत ताकवले आदींसह ग्रामस्थ व विविध विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

घुबड हा तसा शेतकऱ्यासाठी मित्रच आहे. पण त्याच्याबद्दल असलेल्या गैरसमजामुळे किंवा अंधश्रद्धा असल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र त्याबद्दची खरी माहिती या माध्यमातून लोकांपर्यत पोचवली जाते आहे आणि आता या घुबडाकडेही लोक मित्रत्वाच्या नजरेने पाहू लागले आहेत.या मोहत्सवाच्या माध्यमातून हजारो घरात घुबडा बाबतची माहिती आम्ही पोचवू शकलो.
सतीश पांडे, संचालक, इला फाउंडेशन

उलुक उत्सवामुळे या भागातील नागरिकांमध्ये वन्यप्राणी आणि पक्षांबद्दल मोठी जनजागृती झाली आहे. लोकांमध्ये वन्य प्राण्यांबद्दल प्रेम आणि आस्था निर्माण झाली आहे. त्याचबरोबर या भागातील लोकांनी वन्य प्राण्यांबद्दल सहजीवनाला महत्त्व दिले आहे. परिसरात असलेले हरिण, मोर, ससा आणि इतर पक्षी यांच्या संरक्षणाला प्राधान्य दिलं जातं.
– राहुल शिंदे, पोलिस पाटील, पिंगोरी

📤 शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
निरेतील घंटागाडी चालकांची मनमानी

मोठ्या आवाजात हिंदी गाणी; कचरा टाकण्यासाठी महिलांची पायपीट श्रद्धा जोशी.निरा, ता. १४: निरा (ता. पुरंदर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून कचरा

निरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडण्याचे आदेश !

जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान; पुन्हा तपासणी करण्याची होतेय मागणी श्रद्धा जोशी.निरा, ता. २४: जवळपास अवघे शतकभर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आपल्या

लोणंद येथील परीक्षा केंद्रावर ५०३ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

शिस्तबद्ध नियोजन;  पोलिसांच्या उपस्थितीत परीक्षा सुरळीत पार श्रद्धा जोशी.निरा, ता. २२ : लोणंद (ता.खंडाळा) येथील मालोजीराजे विद्यालय आणि न्यू इंग्लिश