💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
Todayताज्या घडामोडीमहत्त्वाचे अपडेट्स

धक्कादायक! जेजुरी गडाच्या पायरीजवळ उडाला भंडाऱ्याचा भडका

नवनिर्वाचित नगरसेविकांसह अनेकजण जखमी.

राहुल शिंदे
निरा, ता. २१ :

पुरंदर तालुक्यातील जेजुरी देवस्थानच्या गडाच्या पायथ्याशी आज खंडेरायाच्या चरणी भंडारा उधळून आशीर्वाद घेताना भंडाऱ्याचा भडका उडाल्याने झालेल्या अपघातात १६ जणांना भाजल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जेजुरीत मतमोजणी पार पडून निकाल जाहीर झाल्यानंतर दर्शन घेण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी कांग्रेसच्या नगरसेविका मोनिका राहुल घाडगे व त्यांचे पती राहुल घाडगे  तसेच प्रभाग क्र.५ मधून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेविका कु. स्वरूपा खोमणे यांसह इतर काही जणांना इजा झाली असून त्यांना तातडीने खासगी व सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची माहिती घेतली आहे. याबाबतचे थोडक्यात वृत्त असे की,  येथील मल्हार नाट्यगृह येथे मतमोजणी व निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार व कार्यकर्ते खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीजवळ भंडारा अर्पण करण्यासाठी गेले होते. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी उधळण केलेल्या भंडाऱ्याने अचानक पेट घेतला व छोटा स्फोटही झाल्याचे समजत आहे.  सुमारे १६ जण भाजले असून यात महिलांचा समावेश आहे.

जखमींची नावे पुढील प्रमाणे – १) रुपाली खोमणे, २) विलास बारभाई, ३) सानिका गाढवे, ४) संस्कार गलांगे, ५) देवल बारभाई , ६) मनीषा चव्हाण, ७) रजनी बारभाई , ८) स्वप्नील लाखे, ९) अनिल बारभाई, १०) गणेश चव्हाण, ११) निशा दादा भालेराव, १२) लक्ष्मी माऊली खोमणे, १३) मोनिका राहुल घाडगे (नवनिर्वाचित नगरसेविका) १४) राहुल कृष्णा घाडगे, १५) कु. स्वरूपा जालिंदर खोमणे (नवनिर्वाचित नगरसेविका),  १६) उमेश भंडलकर.

नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीप बारभाई म्हणाले, गडाच्या पहिल्या पायरीजवळ घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून ज्वालाग्राही व भेसळयुक्त भंडाऱ्याने पेट घेऊन मोठा भडका उडाला. भविष्यात भेसळयुक्त भंडाऱ्याच्या विक्रीवर कडक कारवाई करण्यात येणार असून नगरपालिका याबाबत पुढील काळात कठोर पावले उचलेल.

दरम्यान, आठ महिन्यांपूर्वी माजी प्रमुख विश्वस्त शिवराज झगडे यांनी मुंबई येथे अन्न व औषध भेसळ प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट घेत जेजुरीतील भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. याबाबत मोठी खळबळ माजली होती. कारवाईचे फक्त आदेश झाले मात्र,  ठोस कारवाई झाली नाही. वेळीच कारवाई झाली असती तर हा प्रसंग टळला असता असे मत अनेकांनी व्यक्त केले.

जेजुरीत वर्षातून आठ ते दहा मोठ्या जत्रा, यात्रा, उत्सव होतात. एरवी देखील दर्शनाला गडावर मोठी गर्दी असते. महाराष्ट्राचे कुलदैवत असल्याने राज्यातून तसेच परराज्यातून देखील भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येत असतात.  यावेळी भाविक गडकोट परिसरात भंडारा उधळण करतात व दिवटी पेटवतात. यात्रा, उत्सवप्रसंगी अशी घटना घडल्यास मोठा अनर्थ ओढवू शकतो.  त्यामुळे प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत असे मत संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष तथा माजी विश्वस्त संदीप जगताप, शिवराज झगडे यांनी व्यक्त केले.

📤 शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
निरेतील घंटागाडी चालकांची मनमानी

मोठ्या आवाजात हिंदी गाणी; कचरा टाकण्यासाठी महिलांची पायपीट श्रद्धा जोशी.निरा, ता. १४: निरा (ता. पुरंदर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून कचरा

निरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडण्याचे आदेश !

जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान; पुन्हा तपासणी करण्याची होतेय मागणी श्रद्धा जोशी.निरा, ता. २४: जवळपास अवघे शतकभर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आपल्या

लोणंद येथील परीक्षा केंद्रावर ५०३ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

शिस्तबद्ध नियोजन;  पोलिसांच्या उपस्थितीत परीक्षा सुरळीत पार श्रद्धा जोशी.निरा, ता. २२ : लोणंद (ता.खंडाळा) येथील मालोजीराजे विद्यालय आणि न्यू इंग्लिश