गुळुंचे येथील स्नेहल निगडेची पोलीस अधिकारी पदासाठी निवड
ग्रामस्थांकडून पुन्हा अभिनंदनाचा वर्षाव
श्रद्धा जोशी.
निरा, ता. ०५ :
गुळुंचे (ता. पुरंदर) येथील स्नेहल राजेंद्र निगडे हिची नुकतीच उपविभागीय पोलीस अधिकारीपदासाठी निवड झाली आहे. अथक मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्नेहलने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले होते. तिने पोलीस विभागाला पसंती देत पुढील टप्पा गाठला आहे. तिच्या या निवडीनंतर ग्रामस्थ, कुटुंबीयांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
स्नेहल ही पोलीस अधिकारीपदासाठी नियुक्त होणारी गावातील महिला पोलीस अधिकारी आहे. परीक्षेत यश संपादन केल्यावर तिने गटविकास अधिकारी, तहसीलदार किंवा पोलीस विभागात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर तिने पोलीस विभागाला पसंती दिली आहे. सध्या निवड यादी जाहीर झाली असून त्यात माझी निवड झाली आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नेमणूक आदेश मिळेल असे तिने सांगितले.

