निरा-शिवतक्रार गणातून मोनिका कांबळे यांचा दणदणीत विजय;
४२.३१ टक्के मते मिळवत आघाडी.
श्रद्धा जोशी.
निरा, ता. ९:
पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पुरंदर तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत निरा-शिवतक्रार गणाचा अंतिम निकाल जाहीर झाला असून घड्याळाची टिकटिक सरस ठरली आहे. या गणातून राष्ट्रवादीच्या मोनिका स्वप्निल कांबळे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. कांबळे यांनी एकूण ६,१३६ मते मिळवत आघाडी घेतली.
या गणात एकूण १४,५०३ मते नोंदवली गेली. त्यापैकी १४,४३६ मते ईव्हीएमद्वारे, तर ६७ मते टपाल मतदानाद्वारे पडली आहेत. दरम्यान, विजयी घोषित करताच कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करत गुलाल उधळला.

उमेदवारनिहाय मतविभागणी (टक्केवारीसह):
मोनिका स्वप्निल कांबळे – ६,१३६ मते
👉 ४२.३१ %
वंदना बाळासाहेब भोसले – ३,९६३ मते
👉 २७.३२ %
रेखा नितीन केदारी – ३,००६ मते
👉 २०.७२ %
अर्चना देविदास भोसले – ७३१ मते
👉 ५.०४ %
सोनवणे गीता शुद्धोधन – ४३४ मते
👉 २.९९ %
NOTA (वरीलपैकी एकही नाही) – २३३ मते
👉 १.६१ %
मतांचे विश्लेषण :
या निवडणुकीत विजयी उमेदवार मोनिका कांबळे यांनी दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार वंदना भोसले यांच्यावर २,१७३ मतांची निर्णायक आघाडी घेतली. एकूण मतदानापैकी जवळपास ७० टक्क्यांहून अधिक मते पहिल्या तीन उमेदवारांमध्ये विभागली गेली, यावरून निवडणूक तिरंगी झाल्याचे दिसून आले.
NOTA कडेही लक्ष :
या गटात २३३ मतदारांनी NOTA पर्याय निवडला, ही संख्या एकूण मतदानाच्या १.६१ टक्के इतकी आहे.

