💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
Todayगावगाडाताज्या घडामोडीमहत्त्वाचे अपडेट्सराजकीय

निरा – शिवतक्रार गटातून सिमा धायगुडेंच्या प्रचाराचा झंजावात !


श्रद्धा जोशी.
निरा, ता. ३१:

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे सध्या वेगाने वाहत आहे. निरा- शिवतक्रार गटातून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार सिमा संदिप धायगुडे यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून त्यांच्या प्रचाराचा झंझावात सुरु झाला आहे.

गावभेटीवेळी सिमा धायगुडे यांना चांगला प्रतिसाद मिळत असून धायगुडे दांपत्यावरील लोकांचे प्रेम प्रचारावेळी दिसून येत आहे. महिला, शेतकरी आणि ग्रामीण विकासाशी संबंधित विविध प्रश्नांची त्यांना माहिती आहे.  समाजसेवेच्या अनेक कामांत त्या संदीप धायगुडे यांसह हिरिरीने सहभागी झाल्या आहेत.

प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात त्यांनी गावोगावी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण, बचतगटांना चालना, बळीराजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.  

नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाचा प्रभाव पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर सकारात्मक होत असल्याचे भाजपा कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यावर अनेकांनी सिमा धायगुडे व त्यांचे पती संदीप धायगुडे यांचे अभिनंदन करून ‘आम्ही सोबत आहोत’ चा त्यांना शब्द दिला आहे.

संदीप धायगुडे हे सिमा यांचे पती असून गेली अनेक वर्षे ते समाजकारण व राजकारणात सक्रीय आहेत. निरा शिवतक्रार ग्रामपंचायतीचे ते सदस्य असून विविध व्यवसाय व उद्योगांच्या माध्यमातून हे पती-पत्नी सर्वसामान्य जनतेशी जोडले गेले आहेत. अडचणीत असणाऱ्या अनेकांना या दांपत्याने मदत केली आहे. त्यामुळे एक मोठा जनसमुदाय सिमा धायगुडे यांच्या पाठीशी दिसून येत आहे.

निरेतील प्रभाग पाच मधील अनेक प्रश्न संदीप धायगुडे यांनी पोटतिडकीने मांडले व त्यांची सोडवणूक केली. प्रसंगी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा देण्यास मागेपुढे न पाहणारा नेता म्हणून जशी त्यांची ओळख आहे तशीच  एक सडेतोड, प्रामाणिक व स्वच्छ विचारांचा माणूस म्हणून त्यांकडे पाहिले जाते. पतीच्या कार्यात पत्नीचा वाटा सिंहाचा असतो. आपल्या पतीच्या सामाजिक व राजकीय सेवेदरम्यान त्यांना आधार देत त्यांच्यासोबत उभी राहत अनेकांना मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून सिमा धायगुडे यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांना जनतेचा चांगला पाठींबा मिळत असल्याचे चित्र सध्या तरी आहे.

📤 शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
निरेतील घंटागाडी चालकांची मनमानी

मोठ्या आवाजात हिंदी गाणी; कचरा टाकण्यासाठी महिलांची पायपीट श्रद्धा जोशी.निरा, ता. १४: निरा (ता. पुरंदर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून कचरा

निरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडण्याचे आदेश !

जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान; पुन्हा तपासणी करण्याची होतेय मागणी श्रद्धा जोशी.निरा, ता. २४: जवळपास अवघे शतकभर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आपल्या

लोणंद येथील परीक्षा केंद्रावर ५०३ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

शिस्तबद्ध नियोजन;  पोलिसांच्या उपस्थितीत परीक्षा सुरळीत पार श्रद्धा जोशी.निरा, ता. २२ : लोणंद (ता.खंडाळा) येथील मालोजीराजे विद्यालय आणि न्यू इंग्लिश