💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
Todayआरोग्य

निरेतील अष्टविनायक तरुण मंडळाकडून दत्त घाटावर रक्तदान शिबीराचे आयोजन

श्रद्धा जोशी.
निरा, ता. १५ :

निरा (ता.पुरंदर ) येथील प्रभाग क्र. १ मधील अष्टविनायक तरुण मंडळाच्या वतीने दत्त घाटावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. दत्तजयंती निमित्त आयोजित या शिबिरात अनेक तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले.
लोणंद येथील बालाजी ब्लड बँक आणि अष्टविनायक तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी रक्तदानाचे महत्त्व उपस्थितांना सांगण्यात आले. रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वांनी शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी नीरा शिवतक्रार तसेच पंचक्रोशीतील अनेकांनी रक्तदान केले. सलीम (भाई) शेख व सहकाऱ्यांनी नियोजन केले. यावेळी १०० हून अधिक जणांनी रक्तदान केले. शिबिरात तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता. त्यासह विविध सामाजिक संघटनांचे सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी यांनीही सहभाग घेतला. शिबिर यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. शिबिराचे आयोजन साहिल बागवान व हरीश जेधे यांनी केले. यापुढेही सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा मानस आयोजनकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.

📤 शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
निरेतील घंटागाडी चालकांची मनमानी

मोठ्या आवाजात हिंदी गाणी; कचरा टाकण्यासाठी महिलांची पायपीट श्रद्धा जोशी.निरा, ता. १४: निरा (ता. पुरंदर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून कचरा

निरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडण्याचे आदेश !

जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान; पुन्हा तपासणी करण्याची होतेय मागणी श्रद्धा जोशी.निरा, ता. २४: जवळपास अवघे शतकभर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आपल्या

लोणंद येथील परीक्षा केंद्रावर ५०३ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

शिस्तबद्ध नियोजन;  पोलिसांच्या उपस्थितीत परीक्षा सुरळीत पार श्रद्धा जोशी.निरा, ता. २२ : लोणंद (ता.खंडाळा) येथील मालोजीराजे विद्यालय आणि न्यू इंग्लिश