💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
Todayगावगाडाराजकीय

पुरंदरमध्ये भाजपाची ‘स्वबळावर’ जोरदार खेळी

श्रद्धा जोशी.
निरा, ता. २१ :

पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेनेच्या युतीच्या चर्चांना विराम मिळाल्यावर  एकीकडे भाजप–शिवसेना युती फिस्कटल्याचे दिसून येत आहे. भाजपाने स्वबळावर लढण्याचा निर्धार यापूर्वीच केला होता. त्यातच ऐनवेळी काही दिग्गजांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवल्याने भाजपची ताकद वाढल्याचे दिसून येत आहे.  निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणांसाठी सक्षम उमेदवारांची घोषणा झाल्याने पुरंदरमधील निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग आला आहे.

  पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांपूर्वी सुरू असलेली भाजप–शिवसेना युतीची चर्चा अखेर निष्फळ ठरली. शिवसेनेसोबत युतीचा प्रस्ताव माजी आमदार संजय जगताप यांनी स्पष्टपणे नाकारल्यानंतर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली. युतीच्या नावाखाली अटी-शर्ती मान्य नसल्याने भाजपने सर्व प्रस्ताव फेटाळत ‘स्वबळावर निवडणूक’ लढवण्याची ठाम भूमिका घेतली.

भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीमुळे तालुक्यातील प्रत्येक गट व गणात राजकीय हालचालींना वेग आला असून प्रचार रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.  सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, भाजपची उमेदवार यादी पुढीलप्रमाणे –

    स्थानिक पातळीवर प्रभाव असलेले, अनुभवी व मतदारांमध्ये पकड असलेले उमेदवार मैदानात उतरवल्याने भाजपने सुरुवातीलाच आघाडी घेतल्याचे चित्र आहे. युती फिस्कटल्यामुळे आता निवडणूक थेट बहुरंगी आणि चुरशीची होणार असून, भाजपच्या या घोषणेमुळे इतर पक्षांनाही रणनीती बदलावी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पुरंदरच्या राजकारणात या घडामोडींमुळे आगामी निवडणूक प्रतिष्ठेची आणि ताकदीची लढाई ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

📤 शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
निरेतील घंटागाडी चालकांची मनमानी

मोठ्या आवाजात हिंदी गाणी; कचरा टाकण्यासाठी महिलांची पायपीट श्रद्धा जोशी.निरा, ता. १४: निरा (ता. पुरंदर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून कचरा

निरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडण्याचे आदेश !

जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान; पुन्हा तपासणी करण्याची होतेय मागणी श्रद्धा जोशी.निरा, ता. २४: जवळपास अवघे शतकभर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आपल्या

लोणंद येथील परीक्षा केंद्रावर ५०३ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

शिस्तबद्ध नियोजन;  पोलिसांच्या उपस्थितीत परीक्षा सुरळीत पार श्रद्धा जोशी.निरा, ता. २२ : लोणंद (ता.खंडाळा) येथील मालोजीराजे विद्यालय आणि न्यू इंग्लिश