💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
Todayताज्या घडामोडीप्रबोधन विचारराजकीय

मेढंगी जोशींचा आधारवड हरपला !


श्रद्धा जोशी.
निरा, ता. २९ :

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल बुधवार (ता. २८) रोजी विमान अपघातात अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र हळहळला. चाहते, कार्यकर्ते, मित्र, कुटुंबीय, आप्त, नातलग, सर्वपक्षीय कार्यकर्ते दुःखी झाले. दादांच्या जाण्याने एका भटक्या जमातीच्या तरुणांवर दुःखाची कुऱ्हाड कोसळली आहे. दादा त्यांसाठी मोठा आधारवड होते. जाणून घेऊया नेमकी कहाणी…

मेढंगी जोशी ही भटकी जमात असून महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांची वस्ती आढळते. बारामती तालुक्यातील मेडद येथे या समाजाची मोठी वस्ती आहे. भटकंती करत नंदीबैल घेऊन खेळ करणे हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन. महिला गावोगावी जाऊन गोधड्या शिवतात. बदलत्या काळात नंदीबैल घेऊन फिरण्यासह पारंपारिकतेत बदल करत स्वामी समर्थांच्या नावे भिक्षा मागणे, भविष्य सांगणे, वासुदेवाचे सोंग घेणे अशी उदरनिर्वाहाची नवीन साधने या समाजातील तरुणांनी निवडली. पोटापाण्यासाठी सबंध महाराष्ट्रात भटकंती करताना हा समाज दिसतो.

सर्वच गावात सारखी परिस्थिती नसते. अनोळखी फिरणाऱ्यांना अडवले जाते. अनेकदा चोरीचा आरोप होतो. फिरस्त्या लोकांच्या अनेक व्यथा असतात. परंतु या फिरणाऱ्या मेढंगी जोशी समाजातल्या तरुणांना अजितदादांचा मोठा आधार असायचा. पश्चिम महाराष्ट्रासह इतर विभागात त्यांना अडवून विचारपूस केली असता ते बारामतीचे नाव सांगायचे. अजितदादांचे नाव सांगायचे. “आम्ही अजितदादांच्या बारामतीचे…” असे म्हणताच पुढच्या व्यक्तीचा रागावलेला आवाज शांत होई आणि त्यांना अडचणी येत नसत असे हे तरुण सांगतात. समजा मोठी अडचण आली तर ते दादांना संपर्कदेखील करत असत. दादा लगेच त्यांची अडचण सोडवत आणि “माझ्या बारामतीचे जोशी आहेत रे..” म्हणत. दादा गेल्यावर या तरुणांनी दादांना श्रद्धांजली वाहत एक फ्लेक्स लावला आहे. फ्लेक्सकडे पाहत बोलताना त्यांचे डोळे पाणावले होते.

📤 शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
निरेतील घंटागाडी चालकांची मनमानी

मोठ्या आवाजात हिंदी गाणी; कचरा टाकण्यासाठी महिलांची पायपीट श्रद्धा जोशी.निरा, ता. १४: निरा (ता. पुरंदर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून कचरा

निरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडण्याचे आदेश !

जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान; पुन्हा तपासणी करण्याची होतेय मागणी श्रद्धा जोशी.निरा, ता. २४: जवळपास अवघे शतकभर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आपल्या

लोणंद येथील परीक्षा केंद्रावर ५०३ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

शिस्तबद्ध नियोजन;  पोलिसांच्या उपस्थितीत परीक्षा सुरळीत पार श्रद्धा जोशी.निरा, ता. २२ : लोणंद (ता.खंडाळा) येथील मालोजीराजे विद्यालय आणि न्यू इंग्लिश