💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
Todayकलाकारताज्या घडामोडीव्यवसाय

रेडियमची कामे कमी झाल्याने रेडियम कलाकार संकटात

संकटातील कलाकार – भाग १

श्रद्धा जोशी
निरा, ता. ११ :

साधारण दहा पंधरा वर्षांपूर्वी वाहनांवर नंबर टाकणे, नावे काढणे यासाठी परंपरागत पेंटिंगला पर्याय म्हणून रेडियमचा वापर सुरु झाला होता. आकर्षक पद्धती आणि चमकदारपणा यांमुळे हा व्यवसाय तेजीत आला. कलाकार कटरच्या सहाय्याने विविध आकर्षक कलाकृती निर्माण करू लागले. या उद्योगात तंत्रज्ञान आल्यावर वेगवेगळ्या मशीन्सच्या सहाय्याने या व्यवसायाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. पाहता पाहता काळ बदलला. आता हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) नंबरप्लेट्स  सुरु झाल्या. वाहनांवर नावे टाकण्याचे प्रमाण देखील घटू लागले आहे. त्यामुळे साहजिकच या व्यवसायावर आता आर्थिक संकट येत असून कलाकारांना पुरेसे काम मिळत नसल्याचे चित्र आहे.

एकेकाळी वाहनांवर झळकणाऱ्या चमचमीत रेडीयम नंबर प्लेट्स, ट्रक-टेम्पोवर काढलेली आकर्षक नावे, फुलांची नक्षी, धार्मिक चिन्हे आणि बोधवाक्ये ही केवळ सजावट नव्हती, तर अनेक कलाकारांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन होते. मात्र काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले आणि त्याचा सर्वात मोठा फटका बसला तो रेडीयम नंबर प्लेट बनवणाऱ्या व गाड्यांवर रेडीयमच्या साहाय्याने डिझाईन काढणाऱ्या कलाकारांना. आज या कलाकारांची आर्थिक आवक गंभीर संकटात सापडली आहे.

पूर्वी ग्रामीण व शहरी भागात प्रत्येक नवीन वाहनावर रेडीयमची नंबर प्लेट बनवणे, वाहनमालकाचे नाव, गावाचे नाव, देवाचे नाव किंवा आकर्षक डिझाईन काढणे ही सर्वसाधारण बाब होती. ट्रक, ट्रॅक्टर, एसटी बस, टेम्पो, जीप यावर कलाकारांच्या हातातून साकारलेली अक्षरशैली लोकांचे लक्ष वेधून घेत असे. या कामातून अनेक कुटुंबांचा चरितार्थ चालत होता. मात्र आता हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) सक्तीमुळे हाताने बनवलेल्या रेडीयम नंबर प्लेट्सना जवळपास पूर्णविराम मिळाला आहे.

सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव प्रमाणित नंबर प्लेट्स बंधनकारक केल्याने स्थानिक कलाकारांचे काम एका झटक्यात बंद पडले. पूर्वी दिवसाला दोन-तीन नंबर प्लेट्स, त्यासोबत वाहनांवरील नावे व डिझाईन करून समाधानकारक उत्पन्न मिळत होते. आज मात्र आठवड्याला एखादे काम मिळणेही कठीण झाले आहे.

आता वाहनधारकांच्या आवडी निवडीदेखील बदलत चालल्या आहेत. कार, दुचाकी यावर अतिरिक्त डिझाईन नको, असा कल वाढतो आहे. आधुनिक स्टिकर्स, प्रिंटेड ग्राफिक्स आणि फॅक्टरी-फिटेड डिझाईनमुळे हाताने काढलेल्या रेडीयम कलाकृती मागे पडत चालल्या आहेत. परिणामी कलाकारांची कौशल्ये असूनही त्यांना काम नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

या व्यवसायाशी जोडलेले बहुतांश कलाकार हे अल्पशिक्षित, ग्रामीण भागातील किंवा स्थलांतरित मजूर वर्गातील आहेत. दुसरा व्यवसाय पटकन स्वीकारणे त्यांना सहज शक्य होत नाही. काहींनी मोबाईल अ‍ॅक्सेसरीज, स्टिकर विक्री, पेंटिंगची छोटी कामे स्वीकारली आहेत; मात्र त्यातून मिळणारे उत्पन्न अत्यल्प असल्याने घरखर्च भागवणे कठीण झाले आहे. महागाई वाढत असताना उत्पन्न घटल्याने कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

शासनाने या पारंपरिक व्यावसायिकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा कलाकारांना आधुनिक ग्राफिक्सकडे वळण्यासाठी मदत किंवा पर्यायी रोजगार योजना राबविल्यास त्यांच्या हातांना पुन्हा काम मिळेल. वाहन सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने घेतलेला निर्णय बरोबर आहेच. भविष्यात अनेक नव्या गोष्टी पाहायला मिळतील. बदल हा जीवनाचा अविभाज्य भाग आहेच. परंतु अशा भविष्यात होणाऱ्या बदलांमागे  अनेक कलाकारांच्या विझलेल्या चुलींची कहाणी दडू नये एवढेच!

📤 शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
निरेतील घंटागाडी चालकांची मनमानी

मोठ्या आवाजात हिंदी गाणी; कचरा टाकण्यासाठी महिलांची पायपीट श्रद्धा जोशी.निरा, ता. १४: निरा (ता. पुरंदर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून कचरा

निरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडण्याचे आदेश !

जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान; पुन्हा तपासणी करण्याची होतेय मागणी श्रद्धा जोशी.निरा, ता. २४: जवळपास अवघे शतकभर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आपल्या

लोणंद येथील परीक्षा केंद्रावर ५०३ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

शिस्तबद्ध नियोजन;  पोलिसांच्या उपस्थितीत परीक्षा सुरळीत पार श्रद्धा जोशी.निरा, ता. २२ : लोणंद (ता.खंडाळा) येथील मालोजीराजे विद्यालय आणि न्यू इंग्लिश