💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
Todayगावगाडाताज्या घडामोडीराजकीय

गुळुंचे येथील सुरेश जगताप राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी


श्रद्धा जोशी.
निरा, ता. २४ :

गुळुंचे (ता. पुरंदर) येथील धडाडीच्या कार्यकर्त्याला अखेर न्याय मिळाला आहे. सुरेश जगताप यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्या चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष व गुळूंचेचे माजी सरपंच संतोष निगडे, शरद विजय सोसायटीचे माजी व्हाइस चेअरमन दिलीप निगडे, गुळूंचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष योगेश भोईटे, अभय निगडे, राजेंद्र निगडे, अमोल निगडे, मयूर निगडे, मंगेश निगडे, ओंकार निगडे यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

जगताप हे राष्ट्रवादी पक्षाचे स्थानिक नेते असून त्यांनी गुळुंचे येथे अनेक विकासाची कामे केली होती. सांसद आदर्श ग्राम योजनेत त्यांनी विविध विकासाच्या योजना राबवल्या होत्या. गेल्या काही वर्षांपासून राजकीय पटलावर ते फारसे सक्रीय नव्हते. गतवेळी पंचायत समितीचे पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांच्या पत्नी व माजी सरपंच रत्नमाला सुरेश जगताप यांनी  पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अखेरीस पक्षाने दखल घेत सुरेश जगताप यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीची जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे आता तालुक्यातील पक्ष संघटन वाढेल असा विश्वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. सदर नियुक्ती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी जाहीर केली.  उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या नियुक्तीमुळे बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर व खडकवासला ग्रामीण तालुक्यांची महत्त्वाची जबाबदारी सुरेश जगताप-निगडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, संघटना अधिक मजबूत करणे व तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याची महत्त्वाची भूमिका त्यांना पार पाडावी लागणार आहे. नियुक्तीबद्दल संभाजी होळकर यांनी जगताप-निगडे यांचे अभिनंदन करत त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्यावर विश्वास व्यक्त केला.

निरा गट, गणातील राष्ट्रवादीची ताकद वाढणार ?

सुरेश जगताप यांची नाराजी दूर झाल्याने तसेच त्यांच्या पुन्हा सक्रीय  होण्याने गट व गणातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद वाढेल असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला.   

📤 शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
निरेतील घंटागाडी चालकांची मनमानी

मोठ्या आवाजात हिंदी गाणी; कचरा टाकण्यासाठी महिलांची पायपीट श्रद्धा जोशी.निरा, ता. १४: निरा (ता. पुरंदर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून कचरा

निरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडण्याचे आदेश !

जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान; पुन्हा तपासणी करण्याची होतेय मागणी श्रद्धा जोशी.निरा, ता. २४: जवळपास अवघे शतकभर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आपल्या

लोणंद येथील परीक्षा केंद्रावर ५०३ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

शिस्तबद्ध नियोजन;  पोलिसांच्या उपस्थितीत परीक्षा सुरळीत पार श्रद्धा जोशी.निरा, ता. २२ : लोणंद (ता.खंडाळा) येथील मालोजीराजे विद्यालय आणि न्यू इंग्लिश