निरेत ‘शिवस्वराज’ पतसंस्थेचा बारावा वर्धापनदिन संपन्न
श्रद्धा जोशी.
निरा, ता. ०८ :
निरा (ता. पुरंदर) येथील शिवस्वराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा बारावा वर्धापनदिन नुकताच संपन्न झाला. यावेळी पुरंदरचे तहसीलदार विक्रम रजपूत यांनी पतसंस्थांच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी गुळूंचे येथील स्नेहल राजेंद्र निगडे या नुकत्याच एमपीएससी राज्यसेवा परीक्षेत यशस्वी होऊन डी.वाय.एस.पी. पदावर नियुक्त झाल्याबद्दल त्यांचा तहसीलदार विक्रम रजपूत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

निरा (ता. पुरंदर) येथील शिवस्वराज पतसंस्थेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुरंदरचे तहसीलदार विक्रम रजपूत यांचा सत्कार करताना चेअरमन पृथ्वीराज निगडे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे होते. यावेळी नीरा ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजश्री काकडे, कर्नलवाडीच्या सरपंच सुवर्णा महानवर, उत्तम धुमाळ, विराज काकडे, जितेंद्र निगडे, दयानंद चव्हाण, राजेश काकडे, स्वप्नाली निगडे, विक्रम दगडे, भरत निगडे, तुषार काकडे, विकास गदादे, बबन भोसले, विजय थोपटे, दिलीप थोपटे, राजेश चव्हाण, ॲड. आदेश गिरमे, ॲड. पृथ्वीराज चव्हाण, रोहिदास थोपटे, अनंता शिंदे, प्रकाश कदम, किरण गदादे, विठ्ठल निगडे, बाळासाहेब निगडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संचालक भरत निगडे यांनी केले.
लोकांनी कष्टाने कमावलेले पैसे विश्वासाने पतसंस्थांकडे ठेवलेले असतात. त्या पैशांचा योग्य आणि पारदर्शक विनियोग करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व नव्या व्यावसायिकांना उभे करण्याची जबाबदारी पतसंस्थांची आहे.”
– प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.

निरा (ता. पुरंदर) येथील शिवस्वराज पतसंस्थेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुरंदरचे तहसीलदार विक्रम रजपूत यांच्या हस्ते डि.वाय.एस.पी. पदी नियुक्ती झाल्याबद्दल स्नेहल निगडे यांचा सत्कार करण्यात आला.

