💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
Todayताज्या घडामोडीबळीराजा

कृषी प्रदर्शनातील शेतीचं भविष्य बदलणाऱ्या या पाच अविश्वसनीय गोष्टी आवर्जून पाहाच!


राहुल शिंदे.
निरा, ता. ११ :

बारामती येथे शनिवार ता. १७ ते २४ जानेवारी दरम्यान भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या प्रदर्शनाची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली असून कृषी प्रदर्शनातील शेतीचं भविष्य बदलणाऱ्या या पाच अविश्वसनीय गोष्टी आवर्जून पाहिलाच हव्यात अशी चर्चा होताना दिसत आहे.

गतवर्षीच्या या प्रदर्शनाला दिवसाला ७० हजारांच्या आसपास  शेतकऱ्यांनी भेट दिली होती. यंदा ही संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले आहे. बारामतीत एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिक २०२६ हे कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते आणि देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार यांसह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे.  

या पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार यांनी यासंदर्भात आज शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन आग्रिकल्कर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रात केले होते.यावेळी त्यांनी या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतीमधील नवनवीन प्रयोग आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पाहायला मिळणार असल्याचचे म्हटलं आहे.  या प्रदर्शनांमध्ये त्यांनी पाच गोष्टी प्रामुख्याने मांडल्या असून त्या प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहेत.

या प्रदर्शनात भीमथडी घोड्यांची एक आकर्षक गाथा मांडण्यात येणार आहे. एकेकाळी नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली ही जात प्रामुख्याने फक्त ओझी वाहण्यासाठी वापरली जात होती. पण या घोड्याचे एक खास वैशिष्ट्य आहे, जे त्याला इतरांपेक्षा वेगळे ठरवते. जशी फरारी गाडी क्षणात वेग घेते, तसाच हा घोडा आहे. याच वैशिष्ट्यामुळे तो खास ठरतो.

या प्रदर्शनात शेतकऱ्यांना जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान पाहण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळत आहे. सोलर पॉलीहाऊस, हायड्रोपोनिक्स (मातीशिवाय पाण्यावर आधारित शेती), आणि रोबोटिक तंत्रज्ञान यांसारखी आधुनिक प्रात्यक्षिके येथे असणार आहेत. विशेष म्हणजे, इस्रायल (ठिबक सिंचन), नेदरलँड्स, चीन, ब्राझील आणि जर्मनी यांसारख्या जवळपास १५ ते २० देशांमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

📤 शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
निरेतील घंटागाडी चालकांची मनमानी

मोठ्या आवाजात हिंदी गाणी; कचरा टाकण्यासाठी महिलांची पायपीट श्रद्धा जोशी.निरा, ता. १४: निरा (ता. पुरंदर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून कचरा

निरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडण्याचे आदेश !

जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान; पुन्हा तपासणी करण्याची होतेय मागणी श्रद्धा जोशी.निरा, ता. २४: जवळपास अवघे शतकभर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आपल्या

लोणंद येथील परीक्षा केंद्रावर ५०३ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

शिस्तबद्ध नियोजन;  पोलिसांच्या उपस्थितीत परीक्षा सुरळीत पार श्रद्धा जोशी.निरा, ता. २२ : लोणंद (ता.खंडाळा) येथील मालोजीराजे विद्यालय आणि न्यू इंग्लिश