💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
Todayगावगाडाताज्या घडामोडीमहत्त्वाचे अपडेट्सराजकीय

कोळविहिरे गणातून स्मिता निगडे भरघोस मतांनी विजयी


श्रद्धा जोशी.
निरा, ता. ९:

पुरंदर तालुक्यातील गुळुंचे-कोळविहीरे गणातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार स्मिता संतोष निगडे यांनी सर्वाधिक मते मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. विजयश्री खेचून आणताना त्यांनी ५,७२९ मते मिळवली आहेत.

निरा – कोळविहीरे गट व गणातील लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. गत निवडणुकीत हा गट शिवसेनेने राखला होता. यावेळी मात्र गटात पुन्हा एकदा घड्याळाची टिकटिक सुरु झाली आहे.

या गटात एकूण १५,३४१ मते नोंदवली गेली. यापैकी १५,२८४ मते ईव्हीएमद्वारे, तर ५७ मते टपाल मतदानाद्वारे पडली आहेत. निगडे यांना विजयी घोषित करताच कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करत गुलालाची उधळण केली.

स्मिता संतोष निगडे – ५,७२९ मते

शितल सतिश साळुंके – ४,६६३ मते

म्हस्के सीमा भाग्यवान – ४,२३७ मते

खैरे रत्नमाला दिलीप – ५१९ मते

NOTA (वरीलपैकी एकही नाही) – १९३ मते

या निवडणुकीत स्मिता निगडे यांनी दुसऱ्या क्रमांकावरील शितल साळुंके यांच्यावर १,०६६ मतांची निर्णायक आघाडी घेतली. पहिल्या तीन उमेदवारांमध्येच सुमारे ९५ टक्क्यांहून अधिक मते विभागली गेल्याने लढत अत्यंत चुरशीची तसेच तिरंगी झाल्याचे दिसून आले.

या गटात १९३ मतदारांनी NOTA चा पर्याय निवडला, जे एकूण मतदानाच्या १.२६ टक्के आहेत. यावरून काही प्रमाणात मतदारांमध्ये असमाधान असल्याचेही दिसून आले.

📤 शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
निरेतील घंटागाडी चालकांची मनमानी

मोठ्या आवाजात हिंदी गाणी; कचरा टाकण्यासाठी महिलांची पायपीट श्रद्धा जोशी.निरा, ता. १४: निरा (ता. पुरंदर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून कचरा

निरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडण्याचे आदेश !

जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान; पुन्हा तपासणी करण्याची होतेय मागणी श्रद्धा जोशी.निरा, ता. २४: जवळपास अवघे शतकभर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आपल्या

लोणंद येथील परीक्षा केंद्रावर ५०३ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

शिस्तबद्ध नियोजन;  पोलिसांच्या उपस्थितीत परीक्षा सुरळीत पार श्रद्धा जोशी.निरा, ता. २२ : लोणंद (ता.खंडाळा) येथील मालोजीराजे विद्यालय आणि न्यू इंग्लिश