💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
गावगाडाताज्या घडामोडीराजकीय

पुरंदरमध्ये शिवसेनेचा थेट लढतीचा खंबीर निर्धार


श्रद्धा जोशी.
निरा, ता. २१ :

      पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्याच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाने निवडणूक रणांगणात ठाम पावित्रा घेतल्याचे दिसून आले. शिवसेना व भाजपा युतीकडे अनेकांचे लक्ष लागून होते. त्याची तालुकाभर चर्चाही झाली. मात्र ऐनवेळी ही चर्चा फिस्कटल्याने भाजपाने स्वबळाचा नारा कायम ठेवला तर शिवसेना शिंदे गटाने देखील आपली शक्ती दाखवत प्रभावी व अनुभवसंपन्न उमेदवार निवडणुकीत उतरवण्याला प्राधान्य दिल्याचे दिसून आले.

 भाजपसोबतची युती फिस्कटल्यानंतर कोणतीही राजकीय तडजोड न करता शिवसेनेने चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणांसाठी आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा करत थेट लढतीचा निर्धार केला आहे.  एकला चलो रे! या पक्षांच्या भुमिकेमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी भाजपसोबत युतीसाठी प्रयत्न केले होते. मात्र भाजपकडून सर्व प्रस्ताव फेटाळण्यात आल्याने युतीची चर्चा अखेर निष्फळ ठरली. त्यातच काही दिग्गज नेत्यांनी ऐनवेळी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवल्याने  शिवसेना शिंदे गटासमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र अशा परिस्थितीतदेखील  शिवसेनेने मागे प्रभावी उमेदवार रिंगणात उतरवून आपली ताकद दाखवून दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार –

📤 शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
निरेतील घंटागाडी चालकांची मनमानी

मोठ्या आवाजात हिंदी गाणी; कचरा टाकण्यासाठी महिलांची पायपीट श्रद्धा जोशी.निरा, ता. १४: निरा (ता. पुरंदर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून कचरा

निरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडण्याचे आदेश !

जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान; पुन्हा तपासणी करण्याची होतेय मागणी श्रद्धा जोशी.निरा, ता. २४: जवळपास अवघे शतकभर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आपल्या

लोणंद येथील परीक्षा केंद्रावर ५०३ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

शिस्तबद्ध नियोजन;  पोलिसांच्या उपस्थितीत परीक्षा सुरळीत पार श्रद्धा जोशी.निरा, ता. २२ : लोणंद (ता.खंडाळा) येथील मालोजीराजे विद्यालय आणि न्यू इंग्लिश