💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
Todayगावगाडाताज्या घडामोडीमहत्त्वाचे अपडेट्सराजकीय

पंचायत समितीच्या कोळविहीरे गणातून एकवीस अर्ज वैध


श्रद्धा जोशी.
निरा, ता. २२ :

आज गुरुवार (ता. २२) रोजी छाननी प्रक्रिया पार पडल्यानंतर पंचायत समितीच्या कोळविहीरे गणातून वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी प्रसिद्ध केली आहे. त्याप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष, शिवसेना, भाजपा या प्रमुख पक्षांकडून रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रासह  सतरा अपक्ष नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत. त्यामुळे कोळविहीरे गणातून एकूण एकवीस उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. परंतु, यातील चार उमेदवारांचे दोन अर्ज असल्याने प्रत्यक्षात सतरा उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या दिनांकानंतर लढतीचे अंतिम चित्र समोर येणार आहे.

प्रियांका संकेत निगडे, सोनाली सोमनाथ कणसे, स्मिता युवराज जगताप आणि स्मिता संतोष निगडे यांचे प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. प्रियांका निगडे, सोनाली कणसे आणि स्मिता जगताप यांचे अर्ज अपक्ष म्हणून वैध ठरले आहेत तर स्मिता संतोष निगडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून दाखल केलेला एक आणि अपक्ष म्हणून दुसरा अर्जदेखील वैध ठरला आहे.

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा महासंग्राम सध्या सुरु आहे. पुरंदर तालुक्यातील चार गट व आठ गणात जोरदार राजकीय रणधुमाळी सुरु आहे. नामनिर्देशनपत्र भरण्याच्या अंतिम दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्याचे पाहायला मिळाले.

पुरंदरमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजपाचे मनोमिलन हा चर्चेचा विषय होता व आजही आहे. दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एकत्र आल्याचे देखील पाहायला मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाची तालुक्यातील शक्ती वाढल्याचे दिसून आले. पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी डोळे लावून बसलेले इच्छुक उमेदवार आणि अनेक राजकीय खलबते घडत अंतिम दिवशी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत उमेदवारी या चर्चेचा विषय राहिल्या.

यावेळी अनेक पक्षांकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. निवडणुका जाहीर होताच अनेकांनी ‘आपलं फिक्स आहे !’ ची भूमिका सोशल मिडीयावर घेतली होती. काहींनी गट, गणात संवाद फेऱ्या देखील केल्या. परंतु, अखेरीला पक्षाने तिकीट डावलल्याने अनेकांची निराशा झाली.

अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे :

📤 शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
निरेतील घंटागाडी चालकांची मनमानी

मोठ्या आवाजात हिंदी गाणी; कचरा टाकण्यासाठी महिलांची पायपीट श्रद्धा जोशी.निरा, ता. १४: निरा (ता. पुरंदर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून कचरा

निरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडण्याचे आदेश !

जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान; पुन्हा तपासणी करण्याची होतेय मागणी श्रद्धा जोशी.निरा, ता. २४: जवळपास अवघे शतकभर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आपल्या

लोणंद येथील परीक्षा केंद्रावर ५०३ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

शिस्तबद्ध नियोजन;  पोलिसांच्या उपस्थितीत परीक्षा सुरळीत पार श्रद्धा जोशी.निरा, ता. २२ : लोणंद (ता.खंडाळा) येथील मालोजीराजे विद्यालय आणि न्यू इंग्लिश