पुरंदरमध्ये भाजपाची स्वबळावर लढण्याची भूमिका; शेखर वढणे
इच्छुकांच्या मुलाखती संपन्न
राहुल शिंदे.
निरा, ता. १७ :
पुरंदरमधील चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गण स्वबळावर लढवण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार असून, त्यादृष्टीने तालुकास्तरावर तयारी पूर्ण करण्यात आली आहे. अशी माहिती भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका मोठ्या ताकदीने लढवणार आहे. त्या अनुषंगाने शुक्रवार (ता.१६) रोजी पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या.
महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या मोठ्या यशाबद्दल माजी आमदार संजय जगताप यांनी सर्व विजयी उमेदवारांचे तसेच मतदारांचे आभार मानले.
भाजप देशात क्रमांक एकचा पक्ष असून पुणे जिल्ह्यातही पक्षाने भक्कम स्थान निर्माण केले आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढवून चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गण मोठ्या ताकदीने जिंकून आणू, असा विश्वास माजी आमदार व भाजप नेते अशोक टेकवडे यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, माजी आमदार अशोक टेकवडे, माजी आमदार संजय जगताप, जिल्हा सरचिटणीस गंगाराम जगदाळे, युवा नेते सचिन लंबाते, शैलेश तांदळे, संभाजी काळाने, गिरीश जगताप यांच्यासह पुरंदर तालुका भाजपाचे सर्व पदाधिकारी व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

