💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
Todayमनोरंजनशिक्षण

देशभक्तीपर गीतांनी जिंकली उपस्थितांची मने!


श्रद्धा जोशी.
निरा ता. २७

निरा (ता. पुरंदर)  येथील ज्योतिर्लिंग इंग्लिश मिडीयम स्कुल व कॅपिटल किड्स स्कुलमध्ये प्रजासत्ताकदिनी वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.

२६ जानेवारी रोजी  ‘प्रजासत्ताक दिनी’  शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्कुलच्या प्ले ग्रुप व नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी ‘ये मेरा इंडिया’, ‘ऐसा देश है मेरा’, एलकेजीच्या विद्यार्थ्यांनी ‘जय हो..’. तर विद्यार्थिनींनी ‘इंडियावाले’, युकेजीच्या विद्यार्थ्यांनी ‘सुनो गोर से दुनियावालो’ या देशभक्तीपर गीतांवर बहारदार नृत्य सादर करीत प्रमुख पाहुण्यांसह पालकांची मने जिंकली.

यावेळी स्कुलमध्ये घेतलेल्या विविध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना ज्ञान विज्ञान आणि व्यक्ती विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मच्छिंद्रनाथ मेरगळ,  प्रमुख पाहुणे निवृत्त नाईक अशोक कांबळे  यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन तर आदर्श मातांना संस्थेच्या उपाध्यक्षा आशा मेरगळ यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांवरील  नृत्यांचे पालकांनी कौतुक केले. शिक्षकांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.

📤 शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
निरेतील घंटागाडी चालकांची मनमानी

मोठ्या आवाजात हिंदी गाणी; कचरा टाकण्यासाठी महिलांची पायपीट श्रद्धा जोशी.निरा, ता. १४: निरा (ता. पुरंदर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून कचरा

निरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडण्याचे आदेश !

जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान; पुन्हा तपासणी करण्याची होतेय मागणी श्रद्धा जोशी.निरा, ता. २४: जवळपास अवघे शतकभर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आपल्या

लोणंद येथील परीक्षा केंद्रावर ५०३ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

शिस्तबद्ध नियोजन;  पोलिसांच्या उपस्थितीत परीक्षा सुरळीत पार श्रद्धा जोशी.निरा, ता. २२ : लोणंद (ता.खंडाळा) येथील मालोजीराजे विद्यालय आणि न्यू इंग्लिश